गृहनिर्माण मंत्री ना.प्रकाश महेता यांचा जिल्हादौरा


अलिबाग,जि.रायगड(जिमाका)दि.25- राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता हे शुक्रवार दि.26 रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि.26 रोजी सकाळी साडेआठ वा. मांडवा जेट्टी येथे बोटीने आगमन व मोटारीने पोलीस परेड मैदानकडे प्रयाण, सकाळी 9 वा. 5 मि. नी पोलीस परेड मैदान अलिबाग येथे आगमन, सकाळी सव्वा नऊ वा.  भारतीय प्रजासत्ताक दिन 68 वा वर्धापन दिन समारंभास उपस्थिती, स्थळ- पोलीस कवायत मैदान, अलिबाग,  सकाळी पावणे दहा वा. पोलीस परेड मैदान अलिबाग येथून मोटारीने मांडवा जेट्टीकडे प्रयाण, सकाळी सव्वा दहा वा. बोटीने  मुंबईकडे रवाना.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान