राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
जिल्ह्यात रविवारी लसीकरण
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23:- येत्या रविवारी म्हणजे दि. 28 रोजी राष्ट्रीय  पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून यात 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलीओचा जादा डोस दिला जाणार आहे.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी  उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विश्वनाथ वेटकोळी, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश धालवरकर,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल भुसार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. सचिन जाधव, उपशिक्षणाधिकारी मदार गनी मुजावर तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
 यावेळी माहिती देण्यात आली की, या अभियानासाठी प्रशासनाने पुर्व तयारी केली असून ग्रामीण भागातील 52 प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे शहरी भागात बुथ उभारण्यात येणार असून सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलीओचा डोस देण्यात येईल.  या अभियानात जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी दोन लाख 73 हजार 758 इतके असून  त्यासाठी ग्रामीण भागात 2925 आणि शहरी भागात 241 असे एकूण 3166 पोलीओ बुथवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रेल्वे स्थानक, बस स्थानक  आदी गर्दीच्या ठिकाणी सुद्धा डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यायातील ग्रामीण व शहरी भागातील 7224 आरोग्य कर्मचारी बुथवर नेमण्यात आले असून अंगणवाडी सेविका,शिक्षक तसेच खाजगी संस्थांचा देखील सहभाग आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज