नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम-2025 जाहीर


रायगड-अलिबाग,दि.09 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील दि.03 ऑक्टोंबर 2025 च्या आदेशान्वये राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम 2025 जाहिर करण्यात आला आहे.

मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील दि.03 ऑक्टोंबर 2025 च्या आदेशामधील परिच्छेद 11 मधील 11.1 ते 11.5 नुसार प्रत्येक प्रवर्गातील महिलांच्या जागांची सोडत काढल्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या जागांचे आरक्षण नमूद करुन प्रारुप आरक्षणाची अधिसूचना रहिवाश्यांच्या माहितीसाठी राजपत्रात, वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या वेबसाईटवर गुरुवार, दि.09 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिध्द करण्याबाबत आदेशित केले आहे.

मा.राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश विचारत घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, कर्जत, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सदस्य पदाकरीताचे प्रारुप आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सांकेतीक स्थळावर तसेच नगरपरिषदांच्या सांकेतीक स्थळावर आणि नोटीस बोर्डावर दि.09 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत