उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्ह्यातील चार तालुक्यात रविवारी लसीकरण
उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
जिल्ह्यातील चार तालुक्यात
रविवारी लसीकरण
अलिबाग,दि.28,(जिमाका):- येत्या रविवारी म्हणजे दि.2 जुलै
रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिम
राबविण्यात येत आहे. या अभियानात रायगड जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश करण्यात
आला असून यात 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलीओचा जादा डोस दिला जाणार आहे.
या अभियानात जिल्ह्यातील पनवेल,
उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यात हे उपराष्ट्रीय
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत पोलिओचा ज्यादा डोस देण्यात
येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने पुर्व तयारी केली असून ग्रामीण भागातील 16 प्राथमिक
आरोग्य् केंद्र त्याचप्रमाणे शहरी भागात बुथ उभारण्यात येणार असून सकाळी आठ ते सायंकाळी
पाच या वेळात बालकांना पोलीओचा डोस देण्यात येईल. या चार तालुक्यातील ग्रामीण व शहरी
भागातील अपेक्षित लाभार्थी एक लाख 73 हजार 873 इतके असून त्यासाठी ग्रामीण भागात 1064 आणि शहरी भागात
166 असे एकूण 1230 पोलीओ बुथवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रेल्वे स्थानक,
बस स्थानक आदी गर्दिच्या ठिकाणीसुद्धा डोस
देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी 3108 आरोग्य
कर्मचारी बुथवर नेमण्यात आले असून अंगणवाडी सेविका,शिक्षक तसेच खाजगी संस्थांचा देखील
सहभाग आहे,असे जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी कळविले आहे.
0000000000
Comments
Post a Comment