महिलांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर महिन्याच्या तिसऱ्या तर तालुकास्तरावर महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 

अलिबाग, दि.18 (जिमाका):- महिलांचे प्रश्न तसेच समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर महिन्याच्या तिसऱ्या तर तालुकास्तरावर महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. सर्व स्तरातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणींची सोडवणूक करण्यासाठी व पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी महिला लोकशाही दिन राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुका पातळीवर राबविण्यात येतो.

जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात सकाळी 11 वाजता सदर दिन चे आयोजन करण्यात येते. यादिवशी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

यासाठी समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. अर्जाची आगाऊ प्रत महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक आहे. या दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक आस्थापना विषयक बावी, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर ते महिला लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाही.

महिलांच्या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर झाल्यास त्यांना आपल्या न्याय हक्कासाठी इतरत्र कोठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही. महिला लोकशाही दिनाच्या तक्रारीबाबत अधिक माहितीकरिता जिल्हा परिविक्षा अधिकारी श्रीमती वाघमारे (भ्रमणध्वनी क्र. 9834746068) यांना संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज