महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील समान संधी केंद्राचे समाज कल्याण आयुक्त डॉ.नारनवरे यांच्या हस्ते उद्घाटन


अलिबाग, दि.19 (जिमाका):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड येथे दि.18 ऑक्टोबर 2022 रोजी समाज कल्याण, आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते समान संधी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी सांगितले की, समान संधी केंद्राच्या माध्यमातून भारत सरकार शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती योजना, परराज्य शिष्यवृत्ती योजना, स्वाधार योजना, स्टॅण्ड अप इंडिया योजना, जात प्रमाणपत्र पडताळणी, करिअर मार्गदर्शन इत्यादींबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, या उद्देशाने समान संधी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे चे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाजकल्याण कोकण विभाग प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड प्राचार्य श्री.शेजुळ, उपप्राचार्य श्री. सोनार, श्री.पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह महाड गृहपाल श्री.मोरे, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक