पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा
अलिबाग,दि.28 (जिमाका):- राज्यमंत्री
उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार,
माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड ना.कु.आदिती तटकरे यांचा रविवार,
दि.30 जानेवारी 2022 रोजीचा रायगड जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे-
रविवार, दि.30 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वा. सुतारवाडी येथील
कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. स्थळ : गिताबाग, मु.सुतारवाडी,
पो.जामगाव, ता.रोहा. दुपारी 3.30 वा. सुतारवाडी, ता.रोहा येथून शासकीय वाहनाने मौजे वाशी ता.तळाकडे प्रयाण. सायं.4.00 वा. मौजे वाशी, ता.तळा येथील
वाशी-महागाव रस्त्याचे उद्घाटन कार्यक्रम. सायं.4.15 वा. मौजे वाशी येथून शासकीय
वाहनाने मौजे सोलमवाडीकडे प्रयाण. सायं. 4.30 वा. मौजे सोलमवाडी येथे आगमन व विविध
विकासकामांचे भूमीपुजन, सोलमवाडी येथे सामाजिक सभागृहाचे भूमीपुजन समारंभ,
सोलमवाडी अंतर्गत रस्ता करणे, सोलमवाडी येथे विद्युत पोल बसविणे. सायं. 5.00 वा.
मौजे सोलमवाडी येथून शासकीय वाहनाने मौजे साईधामकडे प्रयाण. सायं.5.10 वा. मौजे
साईधाम येथे आगमन व रस्त्याचे उद्घाटन करणे समारंभास उपस्थिती. सायं.5.45 वा. मौजे
साईधाम ता.तळा येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.
00000
Comments
Post a Comment