महाड येथील कायमस्वरूपी एनडीआरएफ बेस कॅम्प उभारण्याच्या प्रक्रियेत आणखी एक यशस्वी पाऊल --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

 


अलिबाग,दि.25, (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी आवश्यक असलेली शासकीय जागा दुग्धव्यवसाय विभागाने देण्याबाबत सहमती दिली होती. त्यानुसार शासकीय दूध योजना महाड येथील 2.57.46 हेक्टर आर. पैकी 2-00.00 हे. आर इतके क्षेत्र राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांना कायमस्वरुपी बेस कॅम्प तयार करण्यासाठी  संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांच्या नावे वर्ग करण्यात आले आहे,  अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली.

             रायगड जिल्ह्यासह कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांनादेखील आपत्ती काळात तातडीच्या बचाव व मदतकार्यास महाड येथे होणाऱ्या एनडीआरएफ बेसकॅम्पमुळे उपयोग होणार आहे. त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतील हे एक यशस्वी पाऊल असल्याचे पालकमंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

            वातावरणीय बदल, चक्रीवादळे होणे, दरड कोसळणे, अतिवृष्टीमुळे होणारी पूरपरिस्थिती, भू-सख्खलन आदी परिस्थितीत दुर्देवी घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी जिल्ह्यात कायमस्वरूपी एनडीआरएफ पथक तैनात असणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या सकारात्मक प्रक्रियेतून रायगड जिल्ह्यासह कोकणातील किनारपट्टीलगतच्या सर्वच जिल्ह्यांना लाभ होणार आहे. 

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज