192-अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांची निवडणूक निरीक्षकांनी केली पाहणी

 


 

रायगड (जिमाका) दि.11 :- 192 अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या  निवडणूक निरीक्षक (सा.) रुही खान यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील रोहा तालुक्यातील शेंडसई, महाळुंगे, भातसई, डोंगरी, चणेरा, आरे बुद्रुक, न्हावे, खैराले, खैरे खुर्द, खुटाळ मतदान केंद्राना भेटी देत पाहणी केली. मतदान केंद्रात  अद्ययावत असणाऱ्या सर्व भौतिक सुविधेची पाहणी करुन त्रुटीबाबत सूचना देखील केल्या. श्रीमती खान यांनी अलिबाग विधानसभा मतदार संघातील आतापर्यंत 106 मतदार केंद्राना भेटी देऊन पाहणी केली आहे.

याप्रसंगी त्यांचे संपर्क अधिकारी  उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) रविंद्र शेळके आदी उपस्थित होते.

श्रीमती रुही खान यांनी मतदान केंद्रावर निवडणूक भारत आयोगाच्या सूचनेप्रमाणे किमान आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची पाहणी केली. या केंद्राबाहेर प्रकाशाची व्यवस्था करावी असे सांगितले. प्रौढ, स्तनदा माता, किंवा आवश्यक प्रमाणे बेंचेसची खुर्च्यांची व्यवस्था करावी असे सांगितले.  दिव्यांग व वृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर सुलभपणे जाता यावे, यासाठी रॅम्पची उभारणी करण्यात यावी.  निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदान केंद्रावर सुविधांची निर्मिती करण्यात यावी, अशा सूचना यावेळी त्यांनी  दिल्या.

मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रावर सुरळीत प्रवेश, मार्गदर्शक सूचना, दिशादर्शक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती याबाबत त्यांनी माहिती घेतली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक