केवळ दर्शन व्यवस्था सुरु ठेवून,अन्य प्रकारचे सर्व मनोरंजनाचे खेळ व दुकाने बंद करुन यात्रा भरविण्यास मनाई आदेश जारी

 

रायगड(जिमाका)दि.13 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून 189-कर्जत मतदार संघातील मौजे ताकई,ता.खालापूर, येथील 15 दिवस चालणारी सार्वजनिक यात्रा ही पोलीस मनुष्यबळाच्या व्यस्त दिनक्रमामुळे दि.19 व दि.20 नोव्हेंबर 2024 या दोन दिवसांकरिता यात्रेच्या ठिकाणी केवळ दर्शन व्यवस्था सुरु ठेवून, अन्य प्रकारचे सर्व मनोरंजनाचे खेळ व दुकाने बंद करुन यात्रा भरविण्यास जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  किशन जावळे यांनी बाजार व जत्रा अधिनियम, 1862 चे कलम 5 (ग) मधील तरतुदीन्वये मनाई आदेश जारी केला आहे.

दि.12 नोव्हेंबर 2024 ते दि.26 नोव्हेंबर 2024 या कालावधीत मौजे ताकई, ता.खालापूर येथे धाकटी पंढरी विठ्ठल मंदीर ट्रस्ट, खोपोली नगरपरिषद व ग्रामस्थ मंडळ ताकई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यात्रेमध्ये होणारी सर्वात जास्त गर्दी ही मनोरंजनाच्या खेळांच्या ठिकाणी होत असते. त्यामुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान गर्दीचे नियोजन आणि सार्वजनिक वाहतूकीची योग्य व्यवस्था राखण्याकरीता पोलीस मनुष्यबळाच्या अतिशय व्यस्त दिनक्रमामुळे दि.19 नोव्हेंबर ते दि. 20 नोव्हेंबर 2024 या कालावधीत मनोरंजनाच्या खेळावर आवश्यक ते प्रतिबंध ठेवणे आवश्यक असून, या यात्रेच्या कालावधीत दि.19 नोव्हेंबर ते दि. 20 नोव्हेंबर 2024 या कालावधीत सार्वजनिक यात्रेच्या ठिकाणी केवळ दर्शन व्यवस्थासुरु ठेवून मनोरंजनाचे सर्व खेळ व दुकाने बंद करण्यात यावीत.

मा.भारत निवडणूक आयोगाने दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघामध्ये बुधवार, दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या विधानसभा मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता मतदान सुरळीतपणे पार पडणे आवश्यक आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक