१९०-उरण विधानसभा मतदार संघामध्ये दि.१५ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग,ज्येष्ठांचे गृहमतदान

 

रायगड(जिमाका)दि.११:- १९०-उरण विधानसभा मतदार संघामध्ये पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ६८  व दिव्यांग मतदार १६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी १२ ड अर्ज दिले आहेत. त्यानुसार १९०-उरण विधानसभा मतदार संघामध्ये शुक्रवार, दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी दिव्यांग व ज्येष्ठांचे गृहमतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी १९०-उरण विधानसभा मतदार संघ जनार्दन कासार दिली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण मतदारसंघात शुक्रवार,दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी गृहमतदानाकरिता ७ पथके कार्यरत असणार आहेत. ही मतदान प्रक्रिया एक दिवस सुरू राहणार आहे.

श्रीवर्धन मतदारसंघामध्ये ८५ वर्षांवरील ६८ व दिव्यांग १६ मतदार अशा एकूण ८४ मतदारांची गृहमतदानासाठी नोंदणी करण्यात आली आहे. शुक्रवार, दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी घरोघरी जाऊन मतदान केंद्राची उभारणी करूनटपाली मतदान घेतले जाणार आहे

येत्या २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूकीत मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, मतदानासाठी नागरिकांमध्ये जागरुकता यावी, म्हणून मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात मतदानाचे पवित्र कार्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक