जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नागरिकांकरिता “तिरंगा” उपलब्ध

घरोघरी तिरंगा अभियान जिल्ह्यात यशस्वी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन



अलिबाग, दि.04 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत दि.13 ते दि.15 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातही हे अभियान यशस्वीपणे राबविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल, नगरपालिका/नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी नागरिकांकरिता तिरंगा उपलब्ध होण्यासाठी विक्री केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातही नागरिकांकरिता तिरंगा उपलब्ध करण्यात आला आहे. नागरिकांना प्रती ध्वज 30 रुपये याप्रमाणे तिरंगा उपलब्ध होणार आहे.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या विक्री केंद्राचा लाभ घेत हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा हे अभियान जिल्ह्यात यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान