जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव नाही नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हा पशूसंवर्धन विभाग

 

अलिबाग, दि.02 (जिमाका):- जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खाजगी कुक्कुट व्यावसायिक पक्षीगृह व सधन कुक्कुट विकास गट, पेण येथील पक्षी मृत झाले असल्यामुळे विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे यांच्यामार्फत एवियन इन्फ्लूएन्झा प्रयोगशाळा, भोपाळ येथे दि.27 व दि.28 जुलै 2022 रोजी नमुने पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचा निकाल नकारात्मक आला असून पेण तालुक्यातील व जिल्ह्यातील कुक्कुट व्यावसायिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, जिल्ह्यात तसेच पेण तालुक्यात बर्ड फ्लू रोगाचा प्रादूर्भाव झालेला नाही, अशी माहिती जिल्हा पशूसंवर्धन विभागाने कळविली आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत