“घरोघरी तिरंगा” अभियानाच्या प्रचार प्रसिध्दीसाठी दि.08 ऑगस्ट रोजी रॅलीचे आयोजन

 

अलिबाग, दि.04 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियानाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी रायगड जिल्हा परिषद, फिल्ड आऊटरिच ब्यूरो, अहमदनगर, नेहरू युवा केंद्र आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 75 शाळांमधून 75 रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये इयत्ता 8 वी ते 11 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत दि.13 ते दि.15 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरात सर्वत्र प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या अभियानाविषयी जनजागृती करण्याकरिता या रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हर घर जल उत्सव अभियान व स्वच्छ सागर, सुरक्षित सागर या अभियानांविषयीही जनजागृती करण्यात येणार आहे.

या रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिक, माजी सैनिक, युवा मंडळ व शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत