करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना ताप आलेल्या रुग्णांनी कोविड टेस्ट करुन घ्यावी

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका)- सद्य:स्थितीत राज्यामध्ये कोविड-19 या आजाराचा प्रादूर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यानुषंगाने जिल्हयामध्ये सर्व तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे.

जिल्हयामधील खाजगी रुग्णालयात, क्लिनिकमध्ये तापाचे रुग्ण तपासणीसाठी आले असता अशा रुग्णांचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता याची नोंद घेवून त्यांना जवळच्या खाजगी, सरकारी कोविड केअर सेंटर, हेल्थ सेंटर येथे आरटीपीसीआर टेस्ट करुन घेण्याबाबत रुग्णांना सर्व खाजगी डॉक्टरांमार्फत सूचना देण्यात याव्यात.

तपासणी नंतर रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास जवळच्या जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना तात्काळ कळविण्यात यावे. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक, व्यक्ती यांची देखील तात्काळ तपासणी करण्यात यावी. संबंधित बाधित रुग्ण अथवा संपर्कात आलेले नातेवाईक, व्यक्ती सहकार्य करीत नसल्यास तात्काळ जवळच्या शासकीय डॉक्टरांना कळविण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षांना केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज