पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतला कोविशिल्डचा दुसरा डोस
अलिबाग, जि.रायगड, दि.19
(जिमाका):- येथील उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील विशेष लसीकरण कक्षात पनवेल
महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज शुक्रवार, दि.19 मार्च रोजी
"कोविशिल्ड" लस चा दुसरा डोस घेतला.
यावेळी
पनवेल महानगरपालिका उपायुक्त संजय शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी पनवेल
महानगरपालिका डॉ.आनंद गोसावी, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, पनवेल उपजिल्हा रुग्णालय
डॉ.सचिन संकपाळ, पनवेल महानगरपालिकेचे
वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश पंडित, डॉ.नेहा गांगुर्डे, औषध निर्माण अधिकारी अनिल
वायकर सहाय्यक मेट्रन ज्योती गुरव व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
000000

Comments
Post a Comment