राष्ट्रीय फलोत्पादन अभियान इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले


अलिबाग दि.14,(जिमाका):- राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेमधील व्यक्तीगत लाभाच्या घटकांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.  या योजनेमध्ये आंबा पुनरुज्जीवन, नियंत्रित शेती, क्षेत्रविस्तार,सामुहिक शेततळे व काढणी पश्चात तंत्रज्ञान यांसारख्या घटकांचा लाभ दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी  कोणत्या घटकासाठी लाभ घ्यावयाचा आहे, ते अर्जामध्ये स्पष्ट नमूद करावे. विहीत मुदतीमध्ये प्राप्त अर्जांपैकी लक्षांकास अधिन राहून लाभार्थी निवड लॉटरी पद्धतीने जिल्हास्तरावर करण्यात येईल. इच्छुक शेतकऱ्यांनी दि.20 पर्यंत www.hortnet.gov.in  या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रायगड अलिबाग यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन