महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा जिल्हादौरा


अलिबाग दि.12,(जिमाका):- महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समिती  जिल्हा दौऱ्यावर येत असून समितीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
गुरुवार दि.13 रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.  सकाळी साडे नऊ ते पाच वाजता रायगड जिल्ह्यातील गृह (बंदरे) विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल (गौण खनिज) विभाग, फलोत्पादन विभाग आणि औद्योगिक वसाहतीच्या प्रकल्प कामांना भेट व पाहाणी.
रात्री  शासकीय विश्रामगृह, रायगड अलिबाग येथे मुक्काम.
शुक्रवार दि.14 रोजी  सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यातील गृह (बंदरे) विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल (गौण खनिज) विभाग, फलोत्पादन विभाग आणि औद्योगिक वसाहतीच्या प्रकल्प कामांना भेट व पाहाणी. दुपारी तीन वाजता समितीने पाहणीच्यावेळी आढळलेल्या बाबींच्या संदर्भात तसेच लेखी स्वरुपात प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन