मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकपूर्व योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत


 

रायगड-अलिबाग,दि.30(जिमाका):- मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकपूर्व योजनेसाठी अर्ज  https://scholarships.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन भरणे  व शाळा नोडल अधिकारी ऑनलाईन पडताळणी करणे याकरिता  इमाव, विजाभज, विमाप्र  प्रवार्गार्तील इयत्ता 9 वी ते  12 वी मधील विद्यार्थ्यानी शाळा महाविद्यालयांशी संपर्क  साधून या  योजनेसाठी जास्तीत जास्त अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण  रायगड अलिबाग सुनील जाधव यांनी केले आहे.

त्या अनुषंगाने या बाबींची अंमलबजावणी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमार्फत प्रभावीपणे करण्यात यावी, या दृष्टीने पुढीलप्रमाणे सविस्तर सूचना देण्यात येत आहेत :- सर्व महाविद्यालयांनी POST MATRIC (मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना)- इयत्ता ११ वी व त्यापुढील स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनामार्फत लागू असलेली योजना "PM-YASASVI POST MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC AND DNT STUDENTS" ही आहे. या  योजनेंतर्गत अर्ज स्वीकारणे व संस्थास्तरावर पडताळणी करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाने NATIONALSCHOLARSHIP PORTAL (NSP) वर नोंदणी (INSTITUTE REGISTRATION) करणे आवश्यक आहे. ज्या महाविद्यालयांनी यापूर्वीच NSP PORTAL वर नोंदणी केलेली आहे, अशा महाविद्यालयांनी पुनर्नोंदणी करण्याची आवश्यकता नसून त्यांनी आपला INSTITUTE PROFILE अद्ययावत करून विद्यार्थ्यांच्या अर्ज पडताळणीची प्रक्रिया सुरू ठेवावी.

माध्यमिक शाळांनी PRE MATRIC (मॅट्रिकपूर्व योजना) स्तर इयत्ता ९ वी ते १० वी- इयत्ता ९ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनामार्फत लागू असलेली योजना "PM-YASASVI PRE MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC AND DNT STUDENTS" ही आहे. त्या अनुषंगाने सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना NSP PORTAL वर अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन करणे व आवश्यक सूचना देणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, आधार क्रमांक, वैध बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी बाबींची पूर्तता करण्याबाबत मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांच्या अर्जाची संस्थास्तरावर पडताळणी करण्यासाठी माध्यमिक शाळांनी देखील NATIONAL SCHOLARSHIP PORTAL (NSP) वर नोंदणी (INSTITUTE REGISTRATION) करणे अनिवार्य राहील. ज्या माध्यमिक शाळांनी यापूर्वीच NSP PORTAL वर नोंदणी केलेली आहे, अशा शाळांना पुनर्नोंदणी करण्याचीआवश्यकता नसून त्यांनी केवळ आपल्या संस्थेचा प्रोफाइल अद्ययावत करून अर्ज पडताळणीची प्रक्रिया करावी.

 NATIONAL SCHOLARSHIP PORTAL (NSP) वर संस्थांची नोंदणी प्रक्रिया-ज्या महाविद्यालये व माध्यमिक शाळांनी अद्याप NSP PORTAL वर नोंदणी केलेली नाही, अशा संस्थांनी खालीलप्रमाणे INSTITUTE REGISTRATION करणे आवश्यक आहे: https://scholarship.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.२. मुख्य पृष्ठावरील "INSTITUTE REGISTRATION" हा पर्याय निवडावा.३. नोंदणी प्रक्रियेदरम्यान खालील माहिती नमूद करणे आवश्यक आहे:संस्थेचे संपूर्ण नाव AISHE CODE / UDISE CODE / INSTITUTE CODE, राज्य व जिल्हा संस्थेचा संपूर्ण पत्ता, संस्थेच्या प्रमुखांची माहिती (PRINCIPAL / HEAD OF INSTITUTION), अधिकृत ई-मेल आयडी,अधिकृत मोबाईल क्रमांककेंद्र शासनाच्या  PM -YASASVI (Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India)  या योजनेकरिता  इयत्ता 9 वी ते 12 वी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थांना खालीलप्रमाणे पत्रात,वर्गनिहाय आर्थिक मदत

अर्ज प्रक्रिया, अटी निरीक्षण नुसार अर्ज करावे :- पात्रता :-  1. ओबीसी, वीजाभज ,विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी 2. वार्षिक कुटुंबीय उत्पन्नः कमाल 2 लाख  50  हजार असावे . निवड पद्धतः मागील वर्गातील गुणांच्या आधारे मेरिट यादी4. आरक्षण: किमान 30% जागा मुलींसाठी राखीव5. शाळा शासन मान्य असणे आवश्यक 6. किमान उपस्थिती 75 % (Aadhar  authenticated Attendance)

वर्गनिहाय  आर्थिक मदत- इयत्ता 9 वी -10 वी, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, वार्षिक मदत 4000, विशेष बाबी8 वी 9 वीच्या गुणांवर आधारित मेरिट यादी.  11 वी -12 वी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, FRA मान्य प्राधिकरण मान्य अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती, 10 वी/ 11 वीच्या गुणांवर आधारित मेरिट यादी.

          अर्ज प्रक्रिया :-  राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे, शाळा नोडल अधिकारी ऑनलाईन पडताळणी करेल,                     मुलगे व मुलींसाठी स्वतंत्र मेरिट यादी तयार, शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात

आवश्यक कागदपत्रे  :- जात प्रमाणपत्र, जात वैधता, उत्पन्न दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, Aadhar  authenticated ttendance. मागील वर्षाचे गुणपत्रक

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन