भूमिहिन दारीद्रयरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन विक्रीस इच्छुक असणाऱ्या जमीन मालकांनी अर्ज करावेत


 

रायगड-अलिबाग,दि.01(जिमाका):- भूमिहिन दारीद्रयरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील भूमिहिन आदिवासी कुटूंबाना 4 एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा 2 एकर बागायती (ओलिताखालील) जमीन देणेबाबत प्रस्तावित आहे. याकरिता भूमिहिन दारीद्रयरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन विक्रीस इच्छुक असणाऱ्या जमीन मालकांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण श्रीमती तेजस्विनी गलांडे यांनी केले आहे.

‍िही योजना आदिवासी विकास विभागाच्या दि. 28 जुलै 2021 शासन निर्णयान्वये 100 टक्के अनुदानित आहे. शासन निर्णयानुसार जमिन विक्रीसाठी इच्छुक जमीन मालकांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावेत. अर्जदाराचा जमीन विक्री करणारा/जमीन मालक विहीत नमुन्यांतील अर्ज, शेतजमीनीवर कोणताही बोजा नसल्याबाबत संबंधित तलाठी यांचे प्रमाणपत्र व 7/12 उतारा संबंधित परीसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबत प्रमाणपत्र, प्रस्तावित विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचा मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल, जिल्हा समितीपुढे सादर केलेल्या प्रस्तावित शेतजमीन समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही याची शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यास जाणीव असल्याबाबतचे घोषणापत्र व जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणताही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत व सदर जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयात वाद सुरू असल्याबाबत विक्री प्रस्तावातील जमीन कुठेही गहाण नसल्यबाबतचे संबंधित शेतजमिन विक्री करणाऱ्या जमीन मालकाचे शपथपत्र, जमीन विक्रीच्या अर्जावर शेतमीन विक्री करणाऱ्या व्यक्तीशिवाय कुटुंबातील दोन व्यक्तीच्या (उदा. सख्खे भाऊ, पत्नी मुले इ.) स्वाक्षऱ्या असाव्यात व त्यांचे विक्रीबाबत ना-हरकत प्रमाणपत्र.

 

याप्रमाणे जमीन विक्रीस काढलेल्या मालकाने कागदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, रॉयल ग्रॅन्डीअर बिल्डींग, पहिला मजला, रामवाडी पेण या कार्यालयात दि.31 जुलै 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02143-252519 वर संपर्क साधावा.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन