कन्यादान योजनेंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या दांपत्यांनी अर्थसहाय्याकरिता प्रस्ताव सादर करावेत

 

 

रायगड-अलिबाग,दि.30(जिमाका):- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कन्यादान योजनेंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील दांपत्यांनी  अर्थसहाय्याकरिता प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण  रायगड अलिबाग सुनील जाधव यांनी केले आहे.

सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेवून विवाह करणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील दांपत्यांसाठी अर्थसहाय्य देण्याकरिता सन 2019-20 या आर्थिक वर्षापासून कन्यादान योजना राबविण्यात येत आहे.

योजनेचे देण्यात येणारे लाभ पुढीलप्रमाणे असती लः- सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यांना वस्तूरुपात देण्यात येणाऱ्या अनुदान रु.25000/- इतकी थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) पध्दतीने लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्यात येतील. सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या पात्र स्वयंसेवी संस्थांना प्रती जोडप्यामागे रु. 4000/-प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येईल.

योजनेचे मुख्य निकष पुढीलप्रमाणे असतीलः- सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या पात्र स्वयंसेवी संस्थांना प्रती जोडप्यामागे रु.4000/-प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येईल. परंतु यासाठी तीन महिन्यांच्या आत विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. विवाह नोंदणी झाल्यानंतर रक्कम देण्यात येईल. या सामुहिक विवाह सोहळ्याकरिता किमान 10 जोडपी असणे आवश्यक राहील. या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी आहे. तथापि, विधवा महिलेस दुसऱ्या लग्नाकरिता सुध्दा अनुज्ञेय राहील. स्वयंसेवी संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असली पाहिजे, तसेच, अर्ज सादर करताना सदरहू नोंदणी प्रभावी असली पाहिजे. त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्था यांचेविरुध्द कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविलेला किंवा न्यायालयीन प्रकरण नसले पाहिजे.

तसेच विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, दि.02 फेब्रुवारी 2019 शासन निर्णयान्वये या योजनेसाठी अटी/निकष नमुद केले आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग, जि. रायगड  येथे संपर्क साधावा.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन