सण-उत्सव कालावधीत स्थानिकस्तरावर अधिकार प्रदान


अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.5- नजिकच्या काळात असलेल्या सण उत्सवाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,याकरिता रायगड जिल्हा हद्दीत पोलीस कार्यक्षेत्रात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे  पोलीस ठाणे स्वाधीन असणाऱ्या अंमलदार व त्यांचेवरील अधिकारी यांना आपल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत स्थानिक परिस्थितीनुसार, खालील बाबतीत  तोंडी व लेखी आदेश देण्याच्या अधिकार जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी प्रदान केले आहेत. त्यानुसार,सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर किंवा रस्त्यालगत  सभा, मोर्चे, मिरवणुका, पदयात्रा व मनोरंजनाचे कार्यक्रम परवानगी देणे,कार्यक्रमाची जागा, तारीख, वेळ, निश्चित करणे, वर्तणुक किंवा वागणूक प्रतिबंध आदींबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. हे आदेश दि.30 पर्यंत लागू राहतील, असे जिल्हा पोलीस अधिक्षक रायगड-अलिबाग अनिल पारसकर यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक