पावसाळ्यापूर्वीची कामे सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल खरेदी निर्बंधाबाबत जिल्हा प्रशासनाचे पूर्वीचे आदेश रद्द



अलिबाग, जि. रायगड, दि.2 (जिमाका)  : लॉकडाऊन कालावधीच्या अनुषंगाने दि.20 एप्रिल पासून काही बाबी/उपक्रम चालू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
मात्र रायगड जिल्ह्यातील प्रत्येक पेट्रोल व डिझेल पंपावर केंद्र व राज्य शासनाच्या सेवेतील वाहने यांच्यासाठी पेट्रोल किमान 1500 लिटर व डिझेल किमान 2500 लिटर राखीव कोटा ठेवण्यात यावा, तसेच एका दुचाकी वाहनास दररोज कमाल 100 रुपयांचे पेट्रोल देण्यात यावे, एका दिवशी एका वेळेस त्यापेक्षा जास्त पेट्रोल देण्यात येऊ नये, अत्यावश्यक सेवेमधील वाहने सोडून इतर वाहनांसाठी पेट्रोल देण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यापूर्वी देण्यात आले होते.
जिल्ह्यातील अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणार्‍या कंपन्या सुरू आहेत. तसेच काही सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील कामेही सुरू झालेली आहेत. शेतीची कामे, देखभाल दुरुस्तीची कामे इत्यादी मान्सूनपूर्व कामे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरु करणे आवश्यक आहे. याची गरज म्हणून आता जिल्हा प्रशासनाने वरील आदेश रद्द करण्याबाबत कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत