पेण जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र कार्यालयाकडील नादुरुस्त 339 द्रवनत्र पात्रे विक्रीस उपलब्ध इच्छुक खरेदीदारांनी दरपत्रके सादर करावीत


अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका):-  जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, पेण यांच्याकडील नादुरुस्त निर्लेखित केलेली विविध प्रकारची 339 द्रवनत्र पात्रे यांची निविदा पध्दतीने  (जसे आहे तेथून व जशी आहे त्याप्रमाणे) विक्री करावयाची आहेत. निर्लेखित द्रवनत्र पात्रे पशूधन विकास अधिकारी, जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, पेण यांच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत पाहण्यास उपलब्ध असून निविदा अटी व शर्ती इत्यादीबाबत सविस्तर माहिती शासनाच्या रायगड-अलिबाग या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत.

तरी इच्छुक खरेदीदारांनी  दि.10 मार्च ते दि.16 मार्च 2021  या कालावधीत ऑफलाईन लिफाफा पध्दतीने विहित पध्दतीचा अवलंब करुन आपली दरपत्रके दि.16 मार्च 2021  रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयास सादर करावेत. प्राप्त निविदा दि.17 मार्च 2021  रोजी सकाळी 11.00 वा. उघडण्यात येतील. प्राप्त निविदांपैकी एखादी अगर सर्व निविदा कोणतेही कारण न देताना रद्द करण्याचे अधिकार निविदा समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ.सुभाष म्हस्के यांनी कळविले आहे.

०००००० 

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज