महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संकल्पनेतून महिला शेतकरी ते ग्राहक थेट विक्री बाजाराचे आयोजन संपन्न

 



 

अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका):-  जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त काल (दि.8 मार्च रोजी ) हिराकोट तलाव,  अलिबाग येथे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत  (आत्मा) महिला शेतकरी ते ग्राहक थेट विक्री बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात 25 महिला शेतकऱ्यांनी सहभागी नोंदविला व शेतमाल विक्री केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीम.निधी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम. उज्वला बाणखेले ,जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी  श्री. तूपसमुद्रे,  उपनगराध्यक्ष श्रीम. मानसी म्हात्रे,  तालुका कृषी अधिकारी श्रीम. हर्षाली सावंत, मंडळ कृषी अधिकारी सुरेश पाटील तसेच कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा आदिंची उपस्थिती होती.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान