स्वयंसिध्दा वस्तू विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

 

 

रायगड,दि.19(जिमाका) :-  भारतीय उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद, उदया प्रकल्प कार्यालय अलिबाग व टाटा कम्युनिकेशन्स लि.मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि.23 डिसेंबर ते दि.25 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये सकाळी 10.00  ते रात्रौ 10.00 पर्यंत या वेळेत अलिबाग समुद्र किनारा मैदान येथे स्वयंसिद्धा वस्तू विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी, भारतीय उद्योजकता विकास संस्था यांनी दिली आहे.

भारतीय उद्योजकता विकास संस्था द्वारा रायगड व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टाटा कम्युनिकेशन्सच्या प्रायोजकतेने महिलां करीता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गेली चार वर्षे सुरु आहे. या प्रशिक्षणामधून ज्या प्रशिक्षणार्थी महिला उद्योजिकेने आपले स्वतः चे व्यवसाय सुरु केले अशा उद्योजक महिलांना बाजारपेठ मिळावी व त्यामधून त्यांच्या वस्तुला मागणी निर्माण व्हावी या हेतूने टाटा कम्युनिकेशन्सच्या सामाजिक दायीत्व विभागांतर्गत व भारतीय उद्योजकता विकास संस्थेच्या आयोजनातून स्वयंसिद्धा वस्तू व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनामध्ये प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन ईडीआय संस्थेकडून करण्यात आले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान