मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा गतिमानता पंधरवडा पात्र लाभर्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा --महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या

 

 

रायगड,दि.18(जिमाका):- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा गतिमानता पंधरवडा दि.17 डिसेंबर ते दि.30 डिसेंबर 2023 पर्यंत रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या यांनी केले आहे.

राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण-2019 अंतर्गत अनेक नाविन्यपूर्ण योजना व कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतले आहेत. सूक्ष्म व लघु उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच राज्यात व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जाहीर केली आहे. या कार्यक्रमाची गतिमानता वाढविण्यासाठी उद्योग विभागाचे विकास आयुक्त यांनी गतिमानता पंधरवडा घोषित केला आहे.

या पंधरवड्यात रायगड जिल्ह्यातील महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इत्यादी ठिकाणी जनजागृती मेळाव्याच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.तसेच पात्र लाभार्थ्यांचे जागेवर अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कौशल्य उद्येाजकता विकास विभाग,आरसेटी, एमसीईडी, मिटकॉन, इ. संस्थे द्वारे उद्येाजकता विकास प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या युवक/युवतीचे, जिल्ह्यातील औद्योगिक समुह विकास घटक, एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) तसेच भौगोलिक मांनाकन प्राप्त उद्योजकांचे अर्ज प्राधान्याने या पंधरवाड्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजार समोर, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज