जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सेवेचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी

 

 

 रायगड,दि.5(जिमाका):सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे सर्व डाटा डिजीटलायझेशन/संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी, माजी सैनिकांनी www.ksb.gov.in व https://mahasainik.maharashtra.gov.in या  संकेतस्थळावर  नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग (निवृत) ले.कर्नल राहुल वैजनाथ माने यांनी केले आहे.  

  रायगड जिल्ह्यातील सेवा निवृत अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युध्द विधवा,वीर पत्नी,वीर माता/वीर पिता यांनी www.ksb.gov.in व https://mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि.31 मार्च 2025 पूर्वी नोंदणी करावी. कार्यालयातील कोणत्याही अर्जावर कारवाई करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्हाला सध्या/आता कोणत्याही सेवेची आवश्यकता नसली तरीही दोन्ही संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे आहे. या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट़ेशन करण्यासाठी माजी सैनिकांना फी म्हणून रू.100/- लागणार आहेत. माजी सैनिक विधवा व अवलंबिताना फी माफ आहे.  यासाठी या कार्यालयाद्वारे दिलेले ओळखपत्र असणे गरजेचे आहे. 

रजिस्ट़ेशन करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड,सैन्यसेवा पूस्तकाची छायांकित प्रत, माजी सैनिक ओळखपत्र,फोटो,ECHS Card,बँक पासबुक छायांकित प्रत ही कागरदपत्रे आवश्यक आहेत. माजी सैनिकांनी लवकरात लवकर फॉर्म भरून  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावे. 

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज