जिल्हा अग्रणी बँकतर्फे पेणमधील गांधी वाचनालय येथे महाकर्ज मेळाव्याचे होणार आयोजन

 


अलिबाग जि.रायगड,दि.9 (जिमाका) :- वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार आणि जिल्हा अग्रणी  बँक ,बँक ऑफ इंडिया रायगड तर्फे दि.14 ऑक्टोबर  2021 रोजी गांधी वाचनालय, पेण, पेण-खोपोली रोड, वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत  कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .

      पेण शहर परिसरातील सर्व सरकारी, खाजगी अणि सहकारी बँका यामध्ये सहभागी होणार आहेत,या कर्ज मेळाव्यामध्ये छोट्या व्यवसायिकांना मुद्रा योजनेअंतर्गत  शिशू कर्ज, हातगाडी वाले, रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे यांच्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत कर्ज तसेच विविध msme आणि गृह कर्ज, वाहन कर्ज आणि शेतकऱ्यांना, मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना, अणि कुकुट पालन आणि दूध व्यवसाय करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज, NRLM आणि अलिबाग नगर पालिका भागातील बचतगटांना समुदाय कर्ज, नवीन व्यवसाय करु इच्छिणाऱ्या होतकरू साठी जिल्हा उद्योग मार्फत PMEGP, CMEGP या  योजनेंतर्गत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

         त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत 35 टक्के अनुदान असेलेले PMFME अंतर्गत कृषी कर्ज, तसेच नाबार्ड चे कृषी पायाभूत कर्ज या बाबत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने अलिबाग मधील सर्व बँका एकाच छताखाली एकत्र येत आहेत.

     याकरिता लागणारे कागदपत्रे-  अर्ज, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड रेशन कार्ड, फोटो इत्यादी.

      कागदपत्रे घेऊन आपले खाते ज्या बँक शाखेमध्ये आहे त्या स्टॉलवर आपल्याला संबंधित कर्जाबद्दल अर्ज व मार्गदर्शन मिळेल.

     तरी या सूवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाची भरभराट करावी, असे आवाहन  जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी  यांनी  केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक