भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 75 बाईकर्स पूर्ण भारतभर भ्रमण फ्रिडम रायडर बाईक रॅली कार्यक्रम

 

               

अलिबाग, दि.15 (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 75 बाईकर्स पूर्ण भारतभर, भारताचा सांस्कृतिक वारसा, शारिरीक स्वास्थ्य, ई. बाबतचा प्रचार करण्यासाठी भ्रमंती करणार आहेत. ही बाईकर्स दि. 15 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातून प्रवास करणार आहेत. एकूण 75 दिवसांचा हा प्रवास असून देशातील 34 राज्यातून  21 हजार किलोमीटर प्रवास हे 75 बाईकर्स करणार आहेत.

या कालावधीत रायगड जिल्ह्यातून त्यांचा प्रवास दि.16 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे ते मुंबई असा जुना पुणे मुंबई हायवे मार्गाने होणार असून या फ्रिडम रायडर बाईकर्स रॅलीचे  स्वागत जिल्हाधिकारी, डॉ.महेंद्र कल्याणकर, यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली येथे होणार आहे. हे स्वागत करताना खेलो इंडिया कुस्ती केंद्राचे कुस्तीगीर आणि खेळाडू उपस्थित राहणार आहेत. खोपोली पासून पुढ़े ते ठाणे जिल्ह्याकडे प्रवास करणार आहेत. खोपोली ते खारघर पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड त्यांच्या सोबत असतील.  या बाईकर्स करिता आपल्या क्षेत्रातून पुढे प्रवासाच्या वेळी  पोलीस संरक्षण (पोलिस एस्कॉर्ट वाहन) आणि रुग्णवाहिका इत्यादी सुविधा पुरविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, यांनी संबंधित यंत्रणेस  सूचना दिल्या आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, रविंद्र नाईक यांनी कळविले आहे.

                                                                        ०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज