धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.30 नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ
अलिबाग, दि.15 (जिमाका) :-
खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य
खरेदी करिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करिता दि.10 नोव्हेंबर 2022 अखेर पर्यंत
मुदत देण्यात आली होती. तथापि ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामाचा विचार
करता शेतकरी नोंदणी पुरेशी झाली नाही.
त्यामुळे पणन हंगाम 2022-23
मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर
शेतकरी नोंदणीकरिता दि.30 नोव्हेंबर 2022 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. चालू हंगामामध्ये पुरेशा प्रमाणावर शेतकरी नोंदणी
व्हावी, याकरिता यापूर्वी सूचित केल्यानुसार आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान
व भरडधान्य खरेदीकरिता नोंदणी सुरू झाली आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक
संरक्षण विभागाचे अवर सचिव संतोष कराड यांनी कळविले आहे
0000000
Comments
Post a Comment