कृषी विभाग माणगाव यांच्यामार्फत शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण व भेटीचे आयोजन

 


 

अलिबाग,दि.16(जिमाका):- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कृषी विभाग माणगाव यांच्यामार्फत शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण व भेटीचे पाच दिवसांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास तळेगाव दाभाडे येथील फुलशेती, कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कृषी संशोधन केंद्र बाभळेश्वर, कृषीथॉन शेतकरी प्रदर्शन, नाशिक कृषी प्रक्रिया उद्योग व  प्रगतशील शेतकरी इत्यादी ठिकाणास भेट देणार आहेत.

 तरी माणगाव, तळा, रोहा व पाली या तालुक्यातील प्राधान्याने इच्छुक महिला शेतकऱ्यांनी आपली नोंदणी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दि.19 नोव्हेंबर 2022 पूर्वी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी  आनंद कांबळे यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत