जिल्ह्यात गरजू नागरिकांसाठी 21 शिवभोजन केंद्र कार्यान्वित तर 2 हजार थाळ्यांचे नियोजन कोणताही गरजू नागरीक उपाशी राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन घेत आहे काळजी



अलिबाग,जि.रायगड.दि.03 (जिमाका) – करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.
      मात्र या काळात कोणत्याही नागरिकाची उपासमार होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही  नागरिकाची उपासमार होणार नाही, याची जिल्हा प्रशासन सर्व तऱ्हेने काळजी घेत आहे. 
    शासनाच्या  शिवभोजन योजनेंतर्गत जिल्ह्यात जी 21 शिवभोजन केंद्रे सुरु आहेत, त्यांची नावे व थाळींची लक्षांक संख्या पुढीलप्रमाणे आहे--
            मुन्ना चायनीज सेंटर, अलिबाग- लक्षांक 150 थाळी, सप्तश्रुंगी महिला बचतगट कळंबोली, पनवेल- लक्षांक 125 थाळी, न्यू संतोष स्वीट ॲण्ड हॉटेल पनवेल- लक्षांक 125 थाळी, हरी ओम रेस्टॉरंट, उरण- लक्षांक 100 थाळी, हॉटेल कडक कामोठे, पनवेल- लक्षांक 100 थाळी, श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र, पेण- लक्षांक 100 थाळी, गणेश कृपा महिला बचतगट, तळोजा, पाचनंद पनवेल- लक्षांक 100 थाळी, साई भोजनालय, रोहा- लक्षांक 100 थाळी, 100  थाळी वाटप, सुरभी स्वयंसेवी संस्था, अलिबाग- लक्षांक 100 थाळी, इंदिरा महिला औद्योगिक सहकारी संस्था, खालापूर- लक्षांक 100 थाळी, जनता जनार्दन लंच होम आकाश रेस्टाँरंट पाली- लक्षांक 75 थाळी, श्री स्वामी समर्थ भोजनालय, तळा- लक्षांक 75 थाळी, दिव्या महिला बचत गट, खारगांव, म्हसळा- लक्षांक 75 थाळी, हॉटेल रुची, पोलादपूर- लक्षांक 75 थाळी, हॉटेल ओम, पनवेल- लक्षांक 100 थाळी, निखिल एस.पटर्वधन, (विरेश्वर मंदिर), महाड- लक्षांक 50 थाळी, हॉटेल द्वारका गौरी, चवदार तळे, महाड-2- लक्षांक 50 थाळी, सिद्धी महिला बचत गट, मुरुड- लक्षांक 100 थाळी, ओम साई सुशिक्षित बेरोजगार संस्था, कर्जत- लक्षांक 100 थाळी, हॉटेल आस्वाद, श्रीवर्धन- लक्षांक 100 थाळी, साई सुविधा भोजनालय, माणगांव- लक्षांक 100 थाळी.
             शासन निर्णय दि. 1 जानेवारी 2020 नुसार या योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या या शिवभोजन केंद्रावर दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात व एक वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी फक्त  5/- रुपयात लॉकडाऊनच्या काळात गरजू नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. 
            तरी गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
*******


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक