हाराष्ट्र आणि देशाच्या उभारणीत कामगारांचे मोलाचे योगदान - महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात संपन्न
म
रायगड-अलिबाग(जिमाका) दि.1:- उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून शेतकरी, मजूर, औद्योगिक कामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगार तसेच विविध सेवा क्षेत्रातील कष्टकरी बांधव यांच्या परिश्रमामुळेच विकासाची गती कायम राहत असून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीत कामगारांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनील तटकरे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक आचल दलाल, उप वनसंरक्षक राहुल पाटील यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचे गायन केले. ध्वजवंदनानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली तसेच राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ध्वजगीत सादर करण्यात आले. संपूर्ण वातावरण देशभक्तीपर घोषणांनी व राष्ट्रप्रेमाच्या भावनेने भारावून गेले होते. पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, वाहतूक शाखा, गृहरक्षक दल, गुन्हे शाखेचे श्वान पथक, पोलीस दलाचे डायल- 112 पोलीस वाहन, दंगल नियंत्रण वाहन, जलद प्रतिसाद पथक, अग्नीशमन दल, वैद्यकीय सेवेच्या डायल 108 सेवेतील वाहन आदींनी यावेळी संचलनात भाग घेतला.
जिल्हा व राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे- महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या दिनोत्सवानिमित्त आपण सर्वांना संबोधित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या निमित्ताने येथे उपस्थित असलेले स्वातंत्र्यसैनिक, सन्माननीय लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, बंधू-भगिनींनो, अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच पत्रकार बांधवांनो, आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देताना मला विशेष आनंद होत आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र ओळखला जातो. त्यांनी स्वराज्य, सुशासन आणि लोककल्याणाची जी संकल्पना रुजवली, ती आजही आपल्या विकासाच्या वाटचालीला दिशा देणारी आहे. महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा अनेक महान विभूतींनी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून महाराष्ट्राला प्रगत राज्य बनविण्याचा पाया घातला.
आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीत कामगारांचे मोलाचे योगदान आहे. शेतकरी, मजूर, औद्योगिक कामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगार तसेच विविध सेवा क्षेत्रातील कष्टकरी बांधव यांच्या परिश्रमामुळेच विकासाची गती कायम राहते.
मा.पंतप्रधान नरेंद्रमोदीजी, मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब, मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपल्या राज्याचा विकासाचा अध्याय नव्याने सुरु झाला आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत रायगड जिल्ह्यात महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
वेग, सुरक्षितता आणि आधुनिक अभियांत्रिकीचा संगम असलेला मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ हा खऱ्या अर्थाने विकासाला वेग देणारा आधुनिक महामार्ग आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद केली आहे. मिसिंग लिंक जगातील सर्वात रुंद बोगदा (23.5 मीटर) असून लोणावळा तलावाच्या 180 मीटर खालून खोदलेला बोगदा आहे. या ठिकाणी 650 मीटर केबल-स्टेड ब्रिजसह भारतातील सर्वात उंच सत्यावरील पूल पायलॉन उंची (182 मीटर) असून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वांत रुंद बोगदा म्हणून नोंद झाली आहे. मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार असून, घाटातील धोकादायक वळणे टाळल्याने अपघातांचे प्रमाण घटेल. वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरळीत होईल व इंधनाच्या वापरात घट होऊन दररोज सुमारे 1 कोटी रुपयांची बचत होईल.
राज्याचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजे रेवस–रेड्डी सागरी महामार्ग (MS SH-04) हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर धावणारा सुमारे 540 कि.मी. लांबीचा महत्त्वाकांक्षी महामार्ग असून तो रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन किनारी जिल्ह्यांना जोडतो. या प्रकल्पामुळे वेळेची बचत,पर्यटन विकास आणि आर्थिक व शाश्वत विकास शक्य आहे. या महामार्गामुळे श्रीवर्धन, गणपतीपुळे, गुहागर आणि मालवण यांसारखी पर्यटनस्थळे थेट जोडली जाऊन पर्यटनाला चालना मिळेल. तसेच कोकणातील आंबा, काजू आणि मासळीच्या वाहतुकीला वेग मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि गोवा व मुंबई यांच्याशी संपर्क अधिक जलद व सुलभ होईल.
‘तिसरी मुंबई’ (Mumbai 3.0) अंतर्गत रायगड-पेण ग्रोथ सेंटर विकसित होत असून, हे ग्रोथ सेंटर मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) च्या धर्तीवर एक जागतिक दर्जाचे बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून उभारले जाईल. यामध्ये माहिती तंत्रज्ञान (IT), फिनटेक (Fintech) आणि डेटा सेंटर्सच्या क्षेत्रात हजारो रोजगार निर्माण होतील. येथे एज्युकेशन सिटी, मेडिसिटी आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स उभारले जातील. ग्रोथ सेंटर प्रकल्पातून दोन लाखांहून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असून, मोठ्या प्रमाणावर परकीय व खासगी गुंतवणूक आकर्षित होणार आहे. याचबरोबर प्रादेशिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे. रायगड ग्रोथ सेंटर हे अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विरार-अलिबाग मल्टी-मॉडेल कॉरिडोर यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या जवळ असल्याने या भागाचे धोरणात्मक महत्त्व वाढले आहे.
पिढ्यान पिढ्यांचे स्तंभ क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जन्मशताब्दी वर्षाचा नुकताच शुभारंभ झाला, महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा दीप प्रज्वलीत केला. त्यांनी समाजाला दिलेल्या विचारांना व त्यांच्या कार्यांना अभिवादन करते.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी कर्जत येथे शासकीय कृपा महिला वसतीगृह कार्यरत असून येथे महिलांना सुरक्षित निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी एका प्रवेशितेचा जिल्ह्यातील पहिला संस्थात्मक विवाह पूर्ण रितीरिवाजाने संपन्न झाला. ही बाब महिला सन्मान व सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे.
महिला सन्मान आणि सुरक्षिततेसाठी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त 3 टक्के निधीतून सन 2025-26 मध्ये “हिरकणी कक्ष” उभारणीच्या पहिल्या टप्प्यात 16 हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. या कक्षांमुळे महिलांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध होत आहेत.
सदाचार, सदविचार, धर्मनिष्ठा, त्याग, समर्पण, दुरदर्शी, धोरणी, मुत्सद्दी अशा कर्तबगार स्त्रियांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव प्राधान्याने घेतले जाते. या सर्वाभिमुख व्यक्तीमत्वाचा आदर्श जोपासून स्त्रीयांनी पुढे यावे, यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची नोंद घेऊन त्यांना सन्मानित करते. यावर्षी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून हा वितरित केला जाणार आहे.
महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांना सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 या कालावधीसाठी जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार राज्यामध्ये घोषित करण्यात आले असून यामध्ये रायगड जिल्ह्यातील सौ. संगिता सचिन ढेरे, यांना 2020-21 करिता व श्रीमती अश्विनी गाडगीळ यांना 2021-22 पुरस्कार देण्यात आला आहे.
राज्यातील महिलांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सक्षमीकरण करण्यासाठी 22 मे 2025 रोजी 'आदिशक्ती अभियान' सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश लिंगभेदात्मक विचारसरणीला आव्हान देणे, कुपोषण व बालविवाह रोखणे आणि हिंसाचारमुक्त समाज निर्माण करणे हा आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आपण जवळपास 800 ग्रामपंचायतींपर्यंत हे अभियान पोहोचविण्यात यशस्वी ठरलो आहोत.
या आदिशक्ती अभियानाच्या अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना "आदिशक्ती पुरस्कार" देऊन गौरवण्यात येतो. हा पुरस्कार तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर, विशेषतः आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि महिला बचत गटांच्या कामासाठी दिला जातो.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेंतर्गत सन 2025-26 मध्ये 110 जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये पथनाट्य, शालेय उपक्रम, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक व सामाजिक संस्थांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या.
जिल्ह्यातील वन स्टॉप सेंटर मार्फत 396 महिलांना विविध सेवा देण्यात आल्या असून त्यामध्ये समुपदेशन, कायदेशीर सहाय्य, पोलीस सहाय्य, वैद्यकीय मदत आणि निवास व्यवस्था यांचा समावेश आहे.
अनाथ बालकांना शिक्षण व रोजगारात संधी उपलब्ध व्हावी यासाठी 156 बालकांना अनाथ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.बालसंरक्षणाच्या दृष्टीने महाराष्ट्रात बालविवाहांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्यव्यापी मोहीम राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यामध्ये सन 2025-26 मध्ये 9 आणि सन 2026-27 मध्ये आतापर्यंत 7 बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
"बालविवाह मुक्त भारत" या 100 दिवसांच्या अभियानांतर्गत महिला व बालविकास विभागाने व्यापक जनजागृती, समन्वय व प्रतिबंधक उपाययोजना राबवून यंत्रणा अधिक सजग केली आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात 3 हजार 426 अंगणवाड्या कार्यरत असून बालकांच्या पोषण, आरोग्य व शिक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे. स्मार्ट अंगणवाडी योजना ही महाराष्ट्र सरकारचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम असून, पारंपारिक अंगणवाड्यांचे आधुनिक आणि तंत्रज्ञान-सुसज्ज केंद्रांमध्ये रूपांतर करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. रायगड जिल्ह्यातील जवळपास 1 हजार 266 स्मार्ट किट अंगणवाड्यांची निवड झाली असून असून त्या पैकी 900अंगणवाड्यांमध्ये स्मार्ट किट चे वाटप केले आहे.
जगभरातील समुद्रकिना-यांसाठी काही विशिष्ठ मानांकने ठरवून निकषांची पुर्तता असलेल्या (सुरक्षा, सौंदर्य, सुविधा इ. सर्वच बाबतीत पर्यटन स्नेही असलेल्या) समुद्र किना-यांना “ब्लू फ्लॅग” हे मानांकन दिले जाते. रायगडमधील श्रीवर्धन व नागांव समुद्रकिनाऱ्याला “ब्लू फ्लॅग” पायलट मानांकन मिळणे अभिमानास्पद असून, याच धर्तीवर जिल्ह्यातील इतर किनारपट्ट्यांनाही हे मानांकन मिळावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यात आपत्ती प्रवण क्षेत्रामध्ये सौमिकरण उपाययोजनेंतर्गत कोंकण पॅकेज अंतर्गत रू.1000 कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून सदर कामे प्रगती पथावर आहेत.
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. 809 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेत सातत्य राखले जात असून 1 हजार 830 गावांपैकी 1 हजार 718 गावे ODF Plus म्हणून विकसित करण्यात आली आहेत. घनकचरा, सांडपाणी आणि प्लास्टिक व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले जात आहेत

Comments
Post a Comment