जिल्हाधिकारी किशन जावळे यांची स्ट्राँगरुमला भेट
रायगड-अलिबाग,दि.18(जिमाका):- अलिबाग नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने मतपेट्या ठेवण्यात आलेल्या जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय, अलिबाग येथील स्ट्राँगरुमला भेट देवून तेथील सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस बंदोबस्त,सुरक्षा उपकरणे इत्यादी कार्यान्वित असल्याबाबतचा आढावा घेतला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अलिबाग विक्रम पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सागर सांळुखे, अजित टोळकर उपस्थित होते.
०००००००
Comments
Post a Comment