उत्कृष्ट क्रीडापट्टू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावेत


 

रायगड-अलिबाग,दि.17 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड द्वारा जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडापट्टू एक महिला व एक पुरुष, एक दिव्यांग खेळाडू, एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2002  पासून देण्यात येत आहे.  रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडूमार्गदर्शकउत्कृष्ट दिव्यांग खेळाडू यांना हा पुरस्कार 26 जानेवारी 2026 रोजी देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने  सन 2023-2024  सन 2024-2025 या वर्षाचे  पुरस्कार वितरणासाठी या कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत असून इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी केले आहे.

या पुरस्कारामध्ये प्रत्येक विजेत्याला रु.10 हजार रोख, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे बक्षिस दिले जाणार आहे. सन 2023-2024 या वर्षाचे  पुरस्काराकरिता  दि.01 जुलै 2019 ते दि.30 जून 2024 पर्यंतचे कामगिरी तर सन 2024-2025 या वर्षाचे  पुरस्काराकरिता  01 जुलै 2020 ते 30 जून 2025 पर्यंतची कामगिरी ग्राह्य धरले जातील.

पुरस्काराचे  निकष पुढील प्रमाणे आहेत- गुणवंत खेळाडू : या पुरस्कारांतर्गत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून एक महिला खेळाडू, एक पुरुष खेळाडू व एक दिव्यांग खेळाडू यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यामध्ये खेळाडूंनी लगतपूर्व पाच वर्षांपैकी दोन वर्षे त्या जिल्ह्याचे (रायगड जिल्ह्याचे) मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धेमध्ये  प्रतिनिधित्व केलेले असले पाहिजे. खेळाडूने मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा मधील पुरस्कार वर्षाच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ गटामध्ये, शालेय मधील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी लक्षात घेण्यात येईल. यापैकी उत्कृष्ट ठरणाऱ्या तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल. खेळाडूने त्यांचे अर्ज विहित नमुन्यात व  विहित  मुदतीत दि.30 डिसेंबर 2025 पर्यंत या कार्यालयात सादर करावेत.  खेळाडूच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या अर्जासोबत स्पर्धेचे मूळ प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती स्वाक्षंकितमध्ये सादर करणे आवश्यक आहे. खेळाडूने अर्ज अधिकृत जिल्हा संघटनेमार्फत शिफारस करून सादर करणे आवश्यक राहील तथापि अपवादात्मक परिस्थितीत खेळाडू वैयक्तिकरित्या अर्ज करू शकतील. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग पंधरा वर्ष वास्तव्य असले पाहिजे.

           क्रीडा मार्गदर्शक : या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग पंधरा वर्ष वास्तव्य असले पाहिजे. संबंधित जिल्ह्यात क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष क्रीडा मार्गदर्शन म्हणून कार्य केलेले पाहिजे व त्यांचे  वय 30 वर्ष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. गुणांकन करिता त्या जिल्ह्यातील खेळाडूंची कामगिरी ग्राह्य धरली जाईल. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यात पात्र राहणार नाही. एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये  जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेल्या व्यक्तीस पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2025-26 करिता अर्ज करण्याची अंतिम तारीख दि.30 डिसेंबर 2025 अशी राहील.  विहित नमुन्यातील अर्ज पुरस्काराच्या अटी व शर्तींसह कार्यालयीन दिवशी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.  

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन