मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम वसूल

 

रायगड-अलिबाग,दि.18(जिमाका) :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत (दि.13 डिसेंबर 2025) रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. या लोक अदालतीच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टी मिळून एकूण 34 हजार 030 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 790 प्रकरणांमधून एकूण रुपये 7 कोटी 94 लाख 56 हजार 513 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

   या लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून घरपट्टीची एकूण 27 हजार 341 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 8 हजार 316 प्रकरणांमधून रुपये 6 कोटी 80 लाख 14 हजार 963 इतकी घरपट्टी वसुल करण्यात आली. तसेच पाणीपट्टीची 6 हजार 689 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली असून त्यापैकी 1 हजार 474 प्रकरणांमधून रुपये 1 कोटी 14 लाख 41 हजार 550  इतकी पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे.

   अशा प्रकारे घरपट्टी व पाणीपट्टी मिळून एकूण 34 हजार 030 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 790 प्रकरणांमधून एकूण रुपये 7 कोटी 94 लाख 56 हजार 513 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींची आर्थिक स्वयंपूर्णता, महसूलवाढ व प्रशासकीय कार्यक्षमता वाढीस मदत होत असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण विकासाला गती मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शासनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा तसेच उर्वरित रहिवाश्यांनी पाणीपट्टी, घरपट्टी भरणा करण्यात यावी असे आवाहन ग्रामपंचायत विभागामार्फत करण्यात येत आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन