शनिवार पासून कार्यालयीन स्वच्छता पंधरवाडा



अलिबाग, जि. रायगड, दि.12 (जिमाका)- सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात  स्वच्छता रहावी व आनंदी वातावरण रहावे या अनुषंगाने  राज्यात 13 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा तसेच तालुकास्तरावरील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता पंधरवाडा राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज या संदर्भात आयोजित बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंखे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रविकिरण पाटील,  जिल्हा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गजेंद्र केंद्रे,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
 यावेळी  उपस्थितांना माहिती देण्यात आली की, यासंदर्भात राज्य शासनाच्या पाणी पुवरठा व स्वच्छता विभागाच्यावतीन शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून  त्यानुसार, कार्यालयप्रमुखांनी  कार्यालयीन स्वच्छतेसंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने  कार्यालयीन जागा सुटसुटीत नीटनेटकी ठेवणे,  मोकळ्या जागेत कोणत्याही वस्तु नसाव्यात,  कार्यालयीन दस्ताऐवज नीटनेटके ठेवावे,  कार्यालयात येण्याचा मार्ग हा स्वच्छ असावा. तसेच कार्यालयातील स्वच्छता गृहे व शौचालये, तेथील  पाण्याची व्यवस्थेबाबत दक्षता घेणे,  या समस्यांच्या निराकरण या पंधरवाड्यात करण्यात यावे,  कार्यालयातील विद्युत उपकरणे वाहने फर्निचर , अन्य जड वस्तू यांची विल्हेवाट लावणे तसेच दस्तऐवजांचे निंदणीकरण करणे आदी कामे या पंधरवाड्यात करावयाची आहेत.  या अंमलबजावणीसाठी  जिल्हा व तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. या अनुषंगाने कार्यवाही करावी असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत