जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा



अलिबाग, दि.09 (जिमाका):- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण या कार्यालयांतर्गत आदिवासी संघटनांनी आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत आदिवासी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था/गटांना यांत्रिकी बोट व मत्स्यजाळी खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, या योजनेंतर्गत एकूण 10 गटांना प्रति गट रक्कम रुपये 3 लाख 50 हजार अनुदान मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 8 गटांना 60 टक्के रक्कम प्रति गट रुपये 2 लाख 10 हजार याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. त्यामधून 8 गटांनी यांत्रिकी बोट खरेदी केलेली असून त्याचे वितरण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या हस्ते व अलिबाग तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मत्स्य बोट वितरण करताना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती सर्व आदिवासी बांधवांना देण्यात आली. तसेच आदिवासी बांधवांना उद्योग व व्यवसाय करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले व त्याकरिता प्रकल्प कार्यालय सदैव तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी यावेळी उपस्थितांना दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज