रायगड जिल्ह्यात ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरास वर्षभरात 15 दिवसांची विशेष परवानगी


 

रायगड (जिमाका) दि. 11:- केंद्र शासनाच्या दि.10 ऑगस्ट 2017 रोजीच्या अधिसूचनेव्दारे ध्वनीप्रदूषण (नियम व नियंत्रण) सुधारीत नियमनुसार ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरीता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2017 अंतर्गत वर्ष 2025 साठी 15 दिवसांकरिता सकाळी 6.00 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी  आदेश जारी केला  आहे.                                                                                                                                                                                                                                                शिवजयंती-19 फेब्रुवारी, 1 दिवस, होळी पौर्णिमा-13 मार्च, 1 दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती-14 एप्रिल, 1 दिवस, गणपती उत्सव-3 दिवस (दुसरा दिवस, गौरी विसर्जन व अनंत चतुर्दशी), ईद-ए-मिलाद-5 सप्टेंबर, 1 दिवस, गणपती विसर्जन (साखरचौथ गणपती)-11 सप्टेंबर, 1 दिवस,  नवरात्र उत्सव-4 दिवस (सप्तमी, अष्टमी, नवमी व दसरा), दिवाळी (लक्ष्मीपूजन)-1 दिवस, ख्रिसमस, 1 दिवस,  31 डिसेंबर 1 दिवस, या निश्चित केलेल्या दिवसांकरिता सकाळी 6.00 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी आहे.                                                                          

                राज्य शासनाच्या निर्देशानुसार, श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. तसेच, शांतता क्षेत्रात ही सूट लागू नाही. ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सूट ही राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू नाही. प्रकरणी ध्वनी प्रदूषण नियम-2000 मधील तरतूदीचे उल्लंघन  झाल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 19 (अ) नुसार कठोर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.                                                            

राज्य शासनाच्या निर्देशानुसार, श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. तसेच, शांतता क्षेत्रात ही सूट लागू नाही.

                ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सूट ही राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू नाही. प्रकरणी ध्वनी प्रदूषण नियम-2000 मधील तरतूदीचे उल्लंघन  झाल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 19 (अ) नुसार कठोर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज