निर्लेखित साहित्याच्या विक्री करिता जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात

 

 

रायगड,दि.11(जिमाका):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,महाड या संस्थेतील वापरुन निर्लेखित झालेल्या साहित्याची विक्री जसे आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने करणे प्रस्तावित्त आहे. यामध्ये निर्लेखित झालेले यंत्रसामुग्री व उपकरणे इत्यादी साहित्याचा समावेश असून या निविदा प्रक्रियेकरीता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात, असे आवाहन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एन.एस.पुरकर यांनी केले आहे.

विक्री करावयाच्या वस्तू संस्थेतील संबंधीत विभागामध्ये दि. 12 फेब्रुवारी 2025 ते दि.20 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सुटीचे दिवस वगळून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यन्त पहावयास मिळतील. याच कालावधी दरम्यान सादर करावयाच्या विहीत नमुन्यातील निविदा अर्ज रु.300/-(अक्षरी रुपये तीनशे मात्र ) ना परतावा किंमतीत संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येईल.

सदर नमुन्यातील पूर्ण माहीती अचुक पणे भरलेली निविदा अर्जासोबत रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र)  अनामत रक्कम जमा करणे गरजेचे असेल सदर रक्कमेचा भरणा प्राचार्य , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड जि. रायगड या नावाने डी.डी. च्या स्वरुपात करावा. इच्छुक जी.एस.टी. नोंदणी धारक खरेदी दारांनी वर उल्लेख केलेल्या विहीत नमुन्यातील निविदा अर्ज डी.डी. सह (प्रपत्र अ व प्रपत्र ब करीता वेग्ळे स्वतंत्र लिफाफा द्यावा) दि.20 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 5.00 वाजेपर्यन्त सुटीचे दिवस वगळून सिलबंद लिफाप्यात कार्यालयात जमा करावा.

संपूर्ण निविदा प्रक्रीया रदद करण्याची किंवा त्यामध्ये फेरबदल करण्याचा संपूर्ण अधिकार प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड जि. रायगड यांनी राखून  ठेवला आहे.  सदर सिलबंद निविदा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2.30 वा. संस्थेच्या प्राचार्याच्या कक्षात उघडण्यांत येतील .

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज