रायगडच्या जिल्हाधिकारी पदी श्रीमती निधी चौधरी रुजू
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22- रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय
सूर्यवंशी यांची अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे
येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी रायगड
जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती
निधी चौधरी (भा.प्र.से.) यांनी आज पदभार
स्वीकारला.
श्रीमती चौधरी या 2012 पासून भारतीय प्रशासन
सेवेच्या अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी
रायगड जिल्ह्यात पेण उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. मंत्रालयात देखील जलसंधारण विभागात उपसचिव
म्हणून काम केले आहे.
000000

Comments
Post a Comment