महाराष्ट्राची संस्कृती सर्वदूर पोहोचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सव–पालकमंत्री उदय सामंत

 


रायगड दि.12(जिमाका):- महाराष्ट्राच्या संस्कृती मध्ये विविधता आहे. ही संस्कृती संस्कृती सर्वदूर पोहोचविण्यासाठी राज्यशासनाने महासंस्कृती महोत्सव आयोजित केले आहे. यामुळे आपल्या लोक कला, संस्कृती यांचे जतन होणार असल्याचे असे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.   

 सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील पोलीस परेड मैदान अलिबाग येथे आयोजित महा संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महिला व बालवकास मंत्री कु.आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,  आदी उपस्थित होते

आज पहिल्या दिवशी आयोजित अवधूत गुप्ते यांच्या संगीत रजनी कार्यक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.  स्थानिक कलाकारांचा शिवकालीन संस्कृती, मर्दानी खेळ, पोवाड्याच्या माध्यमातून गीत, संगीत आणि नृत्याविष्कारातून सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

 आपली मराठी आणि मराठीची संस्कृती ही कोकणात न राहता ती जगभरात गेली आहे. 16 तारखेपर्यंत चालणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाचा रायगडकरांनी आस्वाद घेवून, अशीच भरभरुन दाद द्यावी.असे आवाहन पालकमंत्री श्री.सामंत यांनी केले.

 हा महोत्सव दि.16 फेब्रुवारी  पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात विविध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला स्वयं सहायता समूहानी आयोजित विविध जिल्हास्तरीय वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते झाले. महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सर्व महिलांशी चर्चा केली. तसेच माहिती घेतली.तसेच महिलांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज