सरळसेवेतील गट-क पदांच्या भरतीसाठी माजी सैनिकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत


रायगड दि.14(जिमाका):-  सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यासाठी कल्याण संघटक-40, वसतीगृह अधिक्षक-17, कवायत प्रशिक्षक -01, शारीरीक प्रशिक्षण निदेशक-01 गट 'क' या पदाकरिता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधिक्षीका, गट-क-01 या पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणी सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होवू शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींचो पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांपैकी 01 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेला उमेदवारामधून दिव्यंगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता, उपलब्ध्तेनुसार भरण्यात येईल.

 ही भरती प्रकिया टिसीएस-आयोएन यांच्यामार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणताही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब साईट ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Recruiment Tab येथे दि.12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून दि.03 मार्च 2024 रोजी सायंकाळी 18.00 वाजेपर्यंज सादर करणे आवशक राहील.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज