गॅस, इंधन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त

 

 

रायगड-अलिबाग,दि.18:- सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरगुती एलपीजी गॅस तसेच पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संभाव्य अडचणींच्या पार्श्वभूमीवर तत्काळ मदत उपलब्ध व्हावी, यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

घरगुती एलपीजी गॅस संदर्भातील तक्रारी व अडचणींसाठी संबंधित तालुक्यांमध्ये पुरवठा निरीक्षण अधिकारी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील तालुकानिहाय संपर्क अधिकारी, पदनाम व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे :- पनवेल – श्रीम. आश्विनी धनवे (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९९६७८९७४४०, उरण – महेश पाटील (नायब तहसिलदार) – ७७७५९९३११३, कर्जत – रवींद्र दळवी (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९०४९१८६२९६, खालापूर – मनोज पवार (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ७४०३३९७७७७, अलिबाग – हर्षल देशमुख (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ७८८९७४०६५२, मुरुड – महेंद्र गांगुर्डे (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९०११९६१२३४, पेण – सतीश शिंदे (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९८९०८९१८५३, रोहा – हेमलता कुरसुंगे (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ८३९०६४६९८८, सुधागड (पाली) – सुखदेव वाढणकर (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ८६०५९३९६३६, माणगाव – राहुल शितोळे (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ८६६८७४७९८३, तळा – नागेश शेगोकर (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९८२२२१००७६, श्रीवर्धन – रुपाली सुने (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ७०२८४६९४४३, म्हसळा – चंद्रशेखर खोत (नायब तहसिलदार) – ९२२६९७१९२५, महाड – योगिता सत्यगिरी (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९२८४६३२१४४, पोलादपूर – रितेश पदलमवार (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९४०४१०२१२८.

जिल्ह्यातील नागरिकांनी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1077 वरही संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माध्यमांवरूनच माहिती घेण्याचे आवाहन केले असून, गॅस व इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन