पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका):- मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा व  पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या अविस्मरणीय कार्याचा स्मरण करण्याचा आजचा दिवस.

  मराठी पत्रकारितेने सशक्त भारतीय लोकशाहीच्या आणि   सुदृढ समाजाच्या निर्मितीत आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो वा सामान्य माणसाचा आवाज असो, मराठी पत्रकारितेमुळे त्यास बळच मिळाले आहे.

            पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मराठी पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करताना समस्त पत्रकार बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज