15 जानेवारीला जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींमध्ये 299 मतदान केंद्रांवर होणार प्रत्यक्ष मतदान तर मतमोजणी 18 जानेवारीला
सुधारित वृत्त क्रमांक :- 12
दिनांक :- 06 जानेवारी 2021
अलिबाग,जि.रायगड दि.06
(जिमाका) :- एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत
संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण
88 आहे. त्यापैकी 78 ग्रामपंचायतींमधील एकूण 299 मतदान केंद्रांवर दि.15 जानेवारी रोजी
प्रत्यक्ष मतदान होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)
श्री.सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे
या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान
शुक्रवार, दि.15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30
वाजेपर्यंत होणार आहे. तर मतमोजणी दि.सोमवार दि.18 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.
या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीकरिता
नामनिर्देशन सादर केलेल्या अर्जातील वैध,अवैध व माघार घेतलेल्या अर्जांची
तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे:- अलिबाग- एकूण 140 अर्ज, त्यातील वैध 137, अवैध
3, माघार 57 एकूण शिल्लक 80. पेण- एकूण 181 अर्ज, त्यातील वैध 179, अवैध 2, माघार
69 एकूण शिल्लक 110. पनवेल- एकूण 691 अर्ज, त्यातील वैध 684, अवैध 7, माघार 252
एकूण शिल्लक 432. उरण- एकूण 247 अर्ज,
त्यातील वैध 236, अवैध 11, माघार 64 एकूण शिल्लक 172. कर्जत- एकूण 297 अर्ज,
त्यातील वैध 292, अवैध 5, माघार 11 एकूण शिल्लक 181. रोहा- एकूण 607 अर्ज, त्यातील
वैध 598, अवैध 9, माघार 224 एकूण शिल्लक 374. माणगाव- एकूण 79 अर्ज, त्यातील वैध
79, अवैध 0, माघार 21 एकूण शिल्लक 58. महाड- एकूण 93 अर्ज, त्यातील वैध 93, अवैध 0,
माघार 17 एकूण शिल्लक 76. श्रीवर्धन- एकूण 97 अर्ज, त्यातील वैध 96, अवैध 1, माघार
23 एकूण शिल्लक 73. म्हसळा- एकूण 43 अर्ज, त्यातील वैध 42, अवैध 1, माघार 10 एकूण
शिल्लक 32.
जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता
एकूण 2 हजार 475 अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 436 अर्ज वैध, 39 अर्ज
अवैध तर 848 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असून एकूण 1 हजार 588
उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
बिनविरोध ग्रामपंचायतीचा तपशिल व मतदान केंद्र
संख्या:- निवडणुका असलेल्या
ग्रामपंचायतींची संख्या 88, एकूण सदस्य 840, एकही
नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेले नाही अशा जागांची एकूण संख्या 3,
माघारीच्या दिनांकानंतर एका जागेसाठी एकच वैध नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिल्याने
बिनविरोध झालेल्या जागांची एकूण संख्या 225, ग्रामपंचायतींतील प्रत्यक्ष मतदान
होणाऱ्या जागांची एकूण संख्या 612, पूर्णत: बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची
संख्या 9, ग्रामपंचायतींच्या एकूण जागांपैकी काही जागी नामनिर्देशन पत्र अप्राप्त
व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान न होणाऱ्या ग्रामपंचायतींची
संख्या 1, प्रत्यक्ष निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या 78, निवडणूक होणाऱ्या
मतदार केंद्रांची संख्या 299.
0000000
Comments
Post a Comment