रायगड जिल्ह्यातील महिलांची गणेशमूर्ती विक्रीत गरुडझेप


       रायगड,(जिमाका) दि.13:- उमेद अभियानांतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात महिलांनी  पाऊल ठेवले आहे. या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. बचत गटातील महिलांनी केल्या 1 लाख 66 हजार 833  गणपतीमूर्ती व्यवसायातून 13 कोटी 13 लाख 87 हजार 200  रुपयांची करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी बचत गटातील महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन केल्यानेजिल्ह्यातील महिला शक्ती गणपती मूर्ती व्यवसायात गरुड झेप घेऊ शकल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पेणमध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देशविदेशात मोठी मागणी आहे. सुबक आखणीनेटकी बैठकसुंदर कोरीवकामरेखीव डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना स्वतची खास ओळख प्राप्त झाली असूनगणपती मूर्तींना गणेशमूर्तीना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या व्यवसायात पेण तालुक्यातील महिला बचतगट उतरले आहेत.

      महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पेण व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विविध बचत गटातील महिला या गणपती व्यवसायात सहभागी झाल्या आहेत. महिला बचत गटांनी 1 लाख 66 हजार 833  गणपती मूर्ती तयार‌ केल्या असूनयामधील 1 हजार 500 गणपती मूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या आहेत. गणपती मूर्ती व्यवसायातून 13 कोटी 13 लाख 87 हजार 200  रुपयांची उलाढाल केली आहे. व्यवसायासाठी उमेद अभियानमार्फत महिला बचत गटांना फिरता निधी तसेच ग्राम संघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा करण्यात आला असूनमहिलांच्या या व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे. या व्यवसायामुळे महिलांच्या हाताला काम मिळाल्यामुळे त्या अधिक सक्षम बनल्या आहेत.

अलिबाग तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 1 हजार 277 असून एकूण उलाढाल लाख 15 हजार. कर्जत तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 3 हजार 450 असून एकूण उलाढाल 30 लाख 50 हजार. खालापूर तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 150 असून एकूण उलाढाल लाख 30 हजार. महाड तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 32असून एकूण उलाढाल लाख 50 हजार. माणगाव तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 42असून एकूण उलाढाल 3 लाख 4हजार. म्हसळा तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 358 असून एकूण उलाढाल 2 लाख 96 हजार 500. मुरुड तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 650 असून एकूण उलाढाल 16 लाख 25 हजार. पनवेल तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 220 असून एकूण उलाढाल 6 लाख 45 हजार. पेण तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 1 लाख 58 हजार 102 असून एकूण उलाढाल 12 कोटी 21 लाख 95 हजार 700. पोलादपूर तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 135 असून एकूण उलाढाल 1 लाख 65 हजार. रोहा तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 98 असून एकूण उलाढाल 60 हजार. श्रीवर्धन तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 450 असून एकूण उलाढाल 6 लाख 65 हजार. सुधागड तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 100 असून एकूण उलाढाल 70 हजार. तळा तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 138 असून एकूण उलाढाल 2 लाख 60 हजार. उरण तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या 965 असून एकूण उलाढाल 7 लाख 15 हजार.  अशा एकूण 1 लाख 66 हजार 833 विक्री केलेल्या मूर्तींची संख्या असून एकूण उलाढाल  13 कोटी 13 लाख 87 हजार 200  रुपयांची करण्यात आली आहे.

जास्तीत जास्त महिलांनी या व्यवसायात सहभागी होवून या माध्यमातून उपजीविकेच्या नवनवीन संधी निर्माण होऊन महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करावी, असे आवाहन  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत