पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय येथे प्रेरणा उत्सवाचे आयोजन शाळांनी विद्यार्थ्यांची प्रेरणा संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी
रायगड,दि.18 (जिमाका) :-केंद्र सरकारच्या निपुण भारत योजना आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या अंतर्गत पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, रायगड येथे सोमवार, दि. 22 जानेवारी 2024 रोजी प्रेरणा उत्सव- 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची प्रेरणा संकेतस्थळावर (prerana.education gov.in) जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य के.वाय. इंगळे यांनी केले आहे.
यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी स्वतःच्या शाळेतील इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांकरिता शालेय स्तरावर " प्रेरणा उत्सव 2024 " आयोजित करावा. या उत्सवात निवड झालेल्या पहिल्या दोन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात होणाऱ्या प्रेरणा उत्सवाकरिता दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठिक 09:30 वा. संबंधित शाळेतील एका शिक्षकासोबत पाठवावे. या दोन विद्यार्थ्यात एक मुलगा आणि एक मुलगी असणे अनिवार्य आहे. नवोदय विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रेरणा उत्सव 2024 करिता सदरील विद्यार्थ्यांना खालीलपैकी एका विषयावर निबंध/कविता किंवा पोस्टर तयार करायचे आहे.
जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर येथे “माझ्या स्वप्नातील भारत- 2047” , “प्रेरणा विद्यालयाला भेट देण्यासाठी माझी निवड का व्हावी ?, या विषयांवर दि. 22 जानेवारी 2024 रोजी सदरील विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊन 15 मुली आणि 15 मुली यांची निवड वडनगर (गुजरात) येथील प्रेरणा स्कूल ला भेट देण्यासाठी करेल. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे शालेय ओळखपत्र तसेच शाळेच्या मुख्याध्यापकाचे संमती पत्र सोबत असणे आवश्यक आहे.
००००००००
Comments
Post a Comment