रायगड जिल्ह्यात महास्वच्छता अभियानाला सुरुवात

 


 

रायगड,दि.17(जिमाका रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात महास्वच्छता अभियान हाती घेण्यात आले असून या अभियानांतर्गत जिल्हा परिषद व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत गावागावात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे अभियान दि.22 जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार असून अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज रामनाथ येथील श्रीराम मंदिर परिसरात रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीमेला सुरुवात करण्यात आली.

 या मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी राहूल कदम, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता प्रसन्नजीत राऊत, कृषी विकास अधिकारी मिलिंद चौधरी, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी महादेव केळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, वरसोली ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

रायगड जिल्ह्यात महा स्वच्छता अभियानांतर्गत मंदिर व तीर्थक्षेत्र, अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय कार्यालये, पर्यटनस्थळे, समुद्र किनारे, मच्छी मार्केट, भाजी मार्केट, समाजमंदिरे, रस्त्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या अभियानात सनाजिक संस्था, महिला बचत गट, नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज